*उपासकांसाठी मार्गदर्शक अमृतवचने*
*१३३.*
*"कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः।"*
हा मंत्र सारखा म्हणत रहावे परिस्थिती अनुकूल होईल.
या मंत्राचा अर्थ खूपच सुंदर आहे तो असा -
कृष्णाय - साक्षात परमात्म्याचे नाव, जो कल्याणकारी, मोक्षकारी आहे.
वासुदेवाय - या शब्दाने शरीर क्लेश जातात.
हरये - याने रोग निवृत्ति होते.
परमात्मने - या शब्दाने महाविष्णू अर्थात आपला आत्मा याची जागृती.
प्रणत - म्हणजे शरणागत.
क्लेशनाशाय - सर्व दुःख आणि क्लेशाचा नाश करणे.
गोविंदाय - या शब्दाने दहा इंद्रियांचे आरोग्य आणि प्रसन्नता प्राप्त होते. प्रत्येक क्षण आनंदायी राहिल.
हा मंत्र किमान रात्री झोपायच्या आधी म्हणावा.
विवेक वृत्ति ठेवून कोणालाही दोष न देता धैर्याने आणि शांत मनाने मानसिक आणि शारिरिक दुःख भोगणे यास क्लेश म्हणतात. विवेक असल्याने या दुःखभोगात सत्व
असते. प्रार्थनेने या सत्वाचा उद्रेक होऊन दुःख निवृत्ति होते.
*श्रीधरभक्त*
0 comments:
Post a Comment