6/05/2016

नाम

श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध
२० डिसेंबर
नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य ॥

प्रारब्धानुसार देहाची गति । तेथे न गुंतवावी आपली वृत्ति ॥
प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥
पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥ म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥
चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥
देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥
प्रारब्धानें आलेले कर्म करीत जावें । त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे ॥ मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥
नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावे सत्य । अखंड राखावें समाधान ।
हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥
परमार्थाला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥
देह सोपवावा प्रारब्धावर । मन गुंतवावे रामावर ॥
||हरये नम:| हरये नम:| हरये नम:||

दत्त

‘त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।’ श्री गुरु देव दत्त   त्रिगुणात्मक आहे, त्रैमूर्ती आहे. श्री दत्तात्रेयांचा जन्म ब्रह्मा, विष्णु आणि महेश यांच्या अंशापासून झालेला आहे. हे तीन देव उत्पत्ती, स्थिती आणि लय यांच्याशी संबंधित असल्यामुळे हे देव वस्तुतः त्रिगुणातीत असूनही कार्यानुसार गुणाश्रयी आहेत, म्हणजे अनुक्रमे रज, सत्त्व आणि तम या त्रिगुणांना ते आश्रय देतात.

‘नेति नेति शब्द न ये अनुमाना ।’  वेदांनी श्री दत्ताचे स्वरूप वर्णन करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीच अनुमान न करता आल्याने ‘नेति, नेति’ म्हणजे ‘असे नाही, असे (ही) नाही’, एवढेच ते सांगू शकले.

‘सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।’  आत-बाहेर पूर्णपणे तू एक दत्त केवळ गुरुतत्त्वरूप, ईश्वरतत्त्व असलेला आहेस.

‘अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।’ म्हणजे आम्हा अभागी, दुर्दैवी लोकांना तुझे माहात्म्य कसे कळणार ?

‘पराही परतली तेथे कैंचा हेत ।’  श्री दत्ताचे वर्णन करायला गेलेली परावाणीही परत फिरली त्यात कोणता हेतू असावा बरे ? दत्ताचे स्वरूप तुर्यावस्थेच्या पलीकडे असल्याने परावाणीही तिथे पोहोचू शकत नाही. यामुळे ती काही न बोलताच परत फिरली.

‘जन्ममरणाचा पुरलासे अंत ।’  श्री दत्ताचे स्वरूप नित्य आणि अनादी-अनंत असे आहे. तिथे जन्ममरण हे शब्दच संपतात.

‘जन्ममरणाचा फेरा चुकविला ।’  जन्ममरणाच्या फेर्‍यातून माझी सुटका केली.
मला मोक्ष दिला.

‘मीतूपणाची झाली बोळवण ।’ याचा भावार्थ आहे, अद्वैतावस्था प्राप्त झाल्याने मी-तू हा आपपरभाव संपला आहे.

दिगंबरा दिगंबरा श्री पाद वल्लभ दिगंबरा ....
#fb source