9/05/2016

Jnani

A jnani has no karma [that is, a jnani performs no actions]. That is his [her] experience. Otherwise he is not a jnani. ~ Sri Ramana Maharshi
from Be As You Are: The Teachings of Sri Ramana Maharshi ~

नामबोध

श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध
२३ मे
देवाकरिता स्वतःला विसरावे.
तुम्ही स्वतःला दिवसातून एकदा तरी विसरता की नाही ? हल्ली आपण आपल्याला विसरतो, पण ते विषयाकरिता विसरतो. स्वतःला विसरावे, पण ते विषयाकरिता विसरू नये. भजन करीत असताना देहभाव विसरून भजन करावे. आपण आता तसे करतो का ? भजन म्हणत असताना कोणी ताल चुकला की लगेच आपण रागावतो; ते खरे भजन होत नाही. म्हणून भजन करावे आणि तशी सवय ठेवावी, म्हणजे देहभाव विसरता ये‍ईल. विषयाच्या अधीन न होता संसार करावा. व्यवहारात काम, क्रोध, लोभ वगैरे सर्व काही असावे, पण आपण त्यांच्या स्वाधीन न होता, त्यांना आपल्या ताब्यात ठेवून वागावे; म्हणजे देहभाव आपोआप नष्ट हो‍ऊन जाईल. हे सर्व साधायला, परमेश्वराला शरण जाणे हा एकच सोपामार्ग आहे; आणि त्याकरिता नामस्मरणात राहणे हेच साधन आहे. विषय बरोबर घेऊन गुरूकडे गेलो, तर गुरूची खरी भेट होईल का ? ती शक्य नाही. याकरिता, ते सांगतील ते साधन आधी करावे म्हणजे चित्त शुद्ध होते, आणि ते झाल्यावर त्यांची खरी भेट होते.
परमात्म्याचे स्मरण । यातच विषयाचे विस्मरण ॥
||हरये नम:|हरये नम:|हरये नम:||

Self

Forget trying to be One with everything. Unicity will be revealed. Do not try to be One. How far will you go? You get to reach a point where you will exclude someone if you try to include everything. First be completely alone, go in the opposite direction.

~ Mooji