पांडुरंगाची आरती
युगें अठ्ठावीस विटेवर उभा ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥
चरणीं वाहे भीमा उद्धरीं जगा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥
तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटीं॥
कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटीं ॥
गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥
सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥
ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥
चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती ॥
दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती ॥
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ॥
पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आलें गा ॥
चरणीं वाहे भीमा उद्धरीं जगा ॥ १ ॥
जयदेव जयदेव जय पांडुरंगा ॥
रखुमाईवल्लभा, राईच्या वल्लभा पावें जिवलगा ॥ धृ ॥
तुळसीमाळा गळां कर ठेउनि कटीं॥
कांसें पीतांबर कस्तुरी लल्लाटी ॥
देव सुरवर नित्य येती भेटीं ॥
गरुड हनुमंत पुढें उभे रहाती ॥ जय. ॥ २ ॥
धन्य वेणूनाद अणुक्षेत्र पाळा ॥
सुवर्णाची कमळें वनमाळा गळा ॥
राई रखुमाबाई राणीया सकळा ॥
ओंवाळीती राजा विठोबा सांवळा ॥ जय. ॥ ३ ॥
ओंवाळूं आरत्या कुरवंड्या येती ॥
चंद्र्भागेमाजी सोडूनियां देती ॥
दिंड्या पताका वैष्णव नाचती ॥
पंढरीचा महिमा वर्णावा किती ॥ जय. ॥ ५ ॥
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजीं स्नानें जे करिती ॥
दर्शन हेळामात्रे तयां होय मुक्ती ॥
केशवासी नामदेव भावें ओंवाळीती ।। जय . ॥ ६ ॥