श्रीब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचा नामबोध
२० डिसेंबर
नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावें सत्य ॥
प्रारब्धानुसार देहाची गति । तेथे न गुंतवावी आपली वृत्ति ॥
प्रारब्धाने देहाची स्थिति । आपण न पालटूं द्यावी वृत्ति ॥
पांडव परमात्म्याचे सखे झाले । तरी वनवासांतून मुक्त नाहीं झाले ॥ म्हणून देह प्रारब्धावर टाकावा । जें होईल तो आनंद मानावा ॥
चित्त ठेवावें भगवंतापायीं । प्रारब्ध आड येऊं शकत नाहीं ॥
देहाचे भोग देहाचे माथां । कष्ट न होती रघुनाथ स्मरतां ॥
प्रारब्धानें आलेले कर्म करीत जावें । त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे ॥ मुखीं असावें एक नाम । याहून दुजें पुण्य नसे जाण ॥
नामीं ठेवावें चित्त । तेंच मानावे सत्य । अखंड राखावें समाधान ।
हीच परमार्थाची खरी खूण जाण ॥
परमार्थाला एकच उपाय जाण । अखंड असावें अनुसंधान ॥
देह सोपवावा प्रारब्धावर । मन गुंतवावे रामावर ॥
||हरये नम:| हरये नम:| हरये नम:||
0 comments:
Post a Comment