मुरावें मनीं आत्मतेनें भरावें
फिरावे बहु देश,ज्ञाना वरावें
बहू पुण्य क्षेत्रां पहावे रहावें
परी शेवटी ईशनामीं वसावें २३०
मनाला उपदेश करताना संत बाबामहाराज म्हणतात की, हे मना ! तू अनेक देश फिरुन ये , ज्ञान संपादन कर मात्र शेवटी तू अंतर्मुख होऊन आत्मरूप हो.
अनेक पुण्यक्षेत्रे पाहावीत तेथे काहीकाळ राहावे मात्र शेवटी ईशनामाच्या ठिकाणीच आपला कायमचा वास असावा.
संत बाबामहाराज आर्वीकर
( मनोपदेश )
https://www.facebook.com/अमृतलहरी-971345102934283/
0 comments:
Post a Comment