12/05/2011

देवीची आरती

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारीं।
वारीं वारीं  जन्म मरणांते वारीं ।
हारी पडलो आता संकट निवारीं॥१॥ 



जय देवी जय देवी महिषासुरमथिनी। सुरवरईश्र्वरवरदे तारक संजीवनी॥धृ॥
त्रिभुवनभुवनीं पहातां तुज ऐसे नाहीं।
चारी श्रमले परंतु न बोलवे कांहीं।
साही विवाद करितां पडले प्रवाहीं ।
ते तूं भक्तां लागीं  पावसी लवलाहीं॥२॥जय देवी o॥

प्रसन्न वदने प्रसन्न होती निजदासा।
क्लेशांपासूनी सोडीं तोड़ीं भवपाशा।
अंबे तुजवांचून कोण पुरवील आशा।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा॥३॥ जय देवी o॥

0 comments:

Post a Comment