5/03/2015

1/15/2015

Bhagwad Geeta


Bhagwad Geeta : श्रीमद् भगवद्गीता 





विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः ।
रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्टवा निवर्तते ॥ (२.५९)

TRANSLATION
The embodied soul may be restricted from sense enjoyment, though the taste for sense objects remains. But, ceasing such engagements by experiencing a higher taste, he is fixed in consciousness.

भावार्थ : इन्द्रियों द्वारा विषयों को ग्रहण न करने वाले मनुष्य के विषय तो मिट जाते हैं, परन्तु उनमें रहने वाली आसक्ति बनी रहती है, ऎसे स्थिर बुद्धि वाले मनुष्य की आसक्ति भी परमात्मा का साक्षात्कार करके मिट जाती है। (२.५९)


1/14/2015

Bhagwad Geeta


Bhagwad Geeta 



यदा संहरते चायं कूर्मोऽङ्गनीव सर्वशः ।
इन्द्रियाणीन्द्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता ॥ (२.५८)
TRANSLATION :
One who is able to withdraw his senses from sense objects, as the tortoise draws its limbs within the shell, is firmly fixed in perfect consciousness.
भावार्थ : जिस प्रकार कछुवा सब ओर से अपने अंगों को समेट लेता है, उसी प्रकार जब मनुष्य इन्द्रियों को इन्द्रिय-विषयों से सब प्रकार से खींच लेता है, तब वह पूर्ण चेतना में स्थिर होता है। (२.५८)

3/26/2013

Various meanings of the word Guru

 
Various meanings of the word Guru
 
The various meanings of the word Guru are explained in the Guru Gita, through a conversation between Lord Shiva and Mother Parvati. Parvati knowing that the entire world meditates on Lord Shiva is curious to know who Lord Shiva himself is ever meditating upon. The 'Guru-tattva' (essence of the Guru) explains Lord Shiva as he also shares the various meanings of the term. Some of them are shared below:



गुकारो भवरोगः स्यात् रुकारस्तन्निरोधकृत्।

भवरोगहरत्वाच्च गुरुरित्यभिधीयते॥ [- गुरु गीता ४५]

gukāro bhavarogaḥ syāt rukārastannirodhakṛt,

bhavarogaharatvācca gururityabhidhīyate. [- Guru-gītā 45]



'Gu' means the disease of birth and death. 'Ru' means the destroyer of birth and death. On account of the power of destroying the disease of birth and death, the teacher is known by the significant name 'Guru'.



गुकारश्च गुणातीतो रूपातीतो रुकारकः।

गुणरूपविहीनत्वात् गुरुरित्यभिधीयते॥ [- गुरु गीता ४६]

gukāraśca guṇātīto rūpātīto rukārakaḥ,

guṇarūpavihīnatvāt gururityabhidhīyate. [- Guru-gītā 46]



The letter 'Gu' denotes that he is above the three gunas (sattva, rajas and tamas) and 'Ru' denotes that he is beyond forms. Because he is free from gunas and forms he is called 'Guru'.



गुकारः प्रथमो वर्णो मायादिगुणभासकः।

रुकारोऽस्ति परं ब्रह्म मायाभ्रान्तिविमोचनम्॥ [- गुरु गीता ४७]

एवं गुरुपदं श्रेष्ठं देवानामपि दुर्लभम्।

गरुडोरगगन्धर्वसिद्धादिसुरपूजितम्॥ [- गुरु गीता ४८]

gukāraḥ prathamo varṇo māyādiguṇabhāsakaḥ,

rukāro'sti paraṁ brahma māyābhrāntivimocanam. [- Guru-gītā 47]

evaṁ gurupadaṁ śreṣṭhaṁ devānāmapi durlabham,

garuḍoragagandharvasiddhādisurapūjitam. [- Guru-gītā 48]



The first syllable 'Gu' makes Maya manifest and 'Ru' is Brahman that removes Maya and delusion. This way, the state of (or the word) Guru is great and sublime, very difficult for even demigods to attain and worthy of worship by Garuda, serpents, Gandharvas, Siddhas and the celestials.



गुकारं च गुणातीतं रुकारं रूपवर्जितम्।

गुणातीतमरूपं च यो दद्यात् स गुरुः स्मृतः॥ [- गुरु गीता ९१]

gukāraṁ ca guṇātītaṁ rukāraṁ rūpavarjitam,

guṇātītamarūpaṁ ca yo dadyāt sa guruḥ smṛtaḥ. [- Guru-gītā 91]



'Gu' indicates the state of the Guru who is beyond attributes and 'Ru' denotes freedom from the shackles of forms. One, who bestows the state beyond attributes and forms, is the Guru.



The term shishya means 'शासते असौ' i.e. one who submits to discipline - the discipline as instructed by the Guru.

11/25/2012

LORD SIVA AND HIS WORSHIP By SRI SWAMI SIVANANDA

LORD SIVA AND HIS WORSHIP By SRI SWAMI SIVANANDA

6/30/2012

श्री विठ्ठल माहात्म्य

श्री विठ्ठल माहात्म्य


पंढरीच्या सावळ्या परब्रह्मांची विविध काळात विविध नावांनी उपासना केली आहे. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि, इ. नांवे भक्तांनी दिलेली आढळतात.आज सर्वपरिचित व प्रचलित नांव म्हणजे 'पांडुरंग'आणि 'श्रीविठ्ठल'. विठ्ठल शब्दाची उत्पत्ती कशी झाली याचा अनेक इतिहासकारांनी व संशोधकांनी अभ्यास केला आहे.बरेच लोक विठ्ठल हा शब्द विष्णु या शब्दाचा अपभ्रंश आहे असे म्हणतात. कानडी शिलालेखातही जे विठ्ठरस, विट्ट असे शब्द आले आहेत ते विष्णु शब्दाची व्याप्ती सांगणारेच आहेत असे मानले जाते.संत तुकोबारायांनी विठोबा शब्दाची उत्पत्ती आपल्या एका अभंगात अत्यंत सोप्या भाषेत केली आहे. तो असा की वि म्हणजे ज्ञान ठोबा म्हणजे आकार -ज्ञानाचा आकार किंवा ज्ञांनाची मूर्ती म्हणजे विठोबा किंवा वि म्हणजे गरूड अणि ठोबा म्हणजे आसन अर्थात गरूड ज्याचे आसन आहे तो विष्णू तोच कटीवर कर ठेवूनि विटेवरी उभा आहे. श्रीकृष्ण, श्रीविष्णु आणि श्रीविठोबा हे एकच आहेत. श्रीकृष्णाचा अवतार द्वापार युगाच्या शेवटी बुधवारी श्रावण वद्य अष्टमीला झाला. विठोबा म्हणजे श्रीकृष्ण म्हणून बुधवार हा विठ्ठलाचा वार मानला जातो.

पुराणातील श्लोकाप्रमाणे
वि कारो विधाताय, ठ कारो नीलकण्ठ |
ल कारो लक्ष्मीकांत, विठ्ठलाभिधिनीयमे ||
अर्थ-
वि- विधाता- ब्रम्हदेव
ठ्ठ- नीलकण्ठ- शंकर
ल- लक्ष्मीकांत- विष्णू
याप्रमाणे म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश हे एकाच ठिकाणी म्हणजेच विठ्ठल नावात आहेत.

|| श्रीविठ्ठल मुर्तीवर्णन ||

दिनांचा दयाळू, भक्तकामकल्पप्रदुम आणि योगियादुर्लभ असलेल्या विठुरायाची मूर्ती स्वयंभू अशी वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी आहे. याचा आकार शिवलिंगासारखा असल्यामुळे त्यास शिवलिंग म्हणतात. श्रींचे मुख उभट आहे. गाल फुगीर आहेत. दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले आहेत. गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके असून ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. नितंब कराभ्याम् धृतो येन तस्मात् असे आद्यशंकराचार्यांनी श्रीविठ्ठल मूर्तीचे पांडुरंगाष्टक लिहून सुंदर व मार्मिक वर्णन केलेले आहे. श्रीविठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले आहेत. उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहे, तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला आहे. छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आहे. कमरेला वस्त्र आहे. वस्त्राचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे.
श्रींचे चरणस्पर्शदर्शन अथवा चरणी मस्तक ठेवून दर्शन घेवून समाधान प्राप्त करण्याचे भाग्य केवळ इथेच आहे.
द्वापार युगात मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होवून गेला. देव-दैत्यांच्या युद्धात देवांनी त्याचे सहाय्य मागितले. मुचकुंद राजाने अतिशय पराक्रम गाजवून देवांना विजय मिळवून दिला. देवांनी प्रसन्न होवून वर मागण्यास सांगितले तेव्हा मुचकुंद म्हणाला, अत्यंत श्रमामुळे मी थकलो, मला एकांती गाढ निद्रा हवी. जो कोणी माझी निद्राभंग करील, तो माझ्या दृष्टीक्षेपाने भस्म होवून जावा. देवांनी तथास्तु म्हटले. राजा एका गुहेत निद्राधीन झाला. पुढे कृष्ण अवतारात जरासंधाकडून कालयौवन नावाचा अत्यंत बलाढ्य असा राक्षस कृष्णाकडे युद्धासाठी आला. हा राक्षस शस्त्र किंवा अस्त्राने मरणार नसल्याने भगवान श्रीकृष्णाने युक्तीने त्या दैत्यास ज्या गुहेत मुचकुंद राजा निद्राधीन झाला होता, त्या गुहेत नेले झोपलेल्या मुचकुंदावर आपल्या अंगावरचा शेला टाकला व स्वत: श्रीकृष्ण अंधारात लपले. भगवान श्रीकृष्णाचा शेला पाहून काळयौवनास वाटले की, कृष्णच झोपला आहे, म्हणून त्याने निद्रिस्त राजावर लत्ताप्रहार केले.मुचकुंद राजाची निद्राभंग झाली.क्रोधीत नजरेने कालयौवनाकडे पाहताच तो दैत्य कापराप्रमाणे जळून भस्म झाला. नंतर श्रीकृष्णाने राजाला दर्शन दिले. भगवान श्रीकृष्णांनी सर्व प्रसंग राजाला सांगितला. तेव्हा मुचकुंद राजाने आता दृष्टीपुढे ऐसाचि तू राहे अशी प्रार्थना केली. भगवान श्रीकृष्णाने पुढील जन्मी तुझी इच्छा पूर्ण करीन, असे अभिवचन दिले. हा मुचकुंद राजा कलियुगात भक्त पुंडलिकाच्या रूपाने जन्माला आला. दिंडीर वनात (पंढरपूर क्षेत्राजवळ) चंद्रभागेतिरी लोहदंड तीर्थाजवळ वास्तव्य करून राहिला.
श्रीकृष्णास असलेल्या मुख्य ८ भार्यांपैकी राधिकादेवीस जवळ बसवून घेतल्याचे श्रीरूक्मिणी देवीने पाहिले असता सवतीमत्सरापोटी श्रीरूक्मिणी रागाने निघून येवून दिंडिर वनात तपश्चर्या करीत बसली. त्यावेळी रूक्मिणीचे शोधार्थ भगवान श्रीक्षेत्र पंढरपूरात आले असता रूक्मिणीचा शोध घेतला असता दिंडीर वनात तपश्चर्या करीत असल्याचे दिसले म्हणून तपश्चर्या भंग करू नये व मुचकुंद राजास पूर्वजन्मी दिलेल्या वरानुसार रूक्मिणीच्या शोधाचे निमित्त साधून तीर्थक्षेत्री पुंडलिकासाठी आले.

पुंडलिक पूर्वाश्रमी माता-पित्याचा द्रोह करीत असे. पत्नीच्या हट्टासाठी तो तिच्याबरोबर काशीयात्रेस निघाला. जाताना कुक्कुट मुनीच्या आश्रमात राहिला. कुक्कुटमुनी परम मातृ-पितृ भक्त होते. माता-पित्याची निस्सीम सेवा केल्यामुळे त्यांना अलौकिक सामर्थ्य प्राप्त झाले होते. पापी, दुराचारी अधमांनी स्नान केल्याने दूषित मलीन झालेल्या गंगा, यमुना, सरस्वती या नद्या मालिन्यनाशासाठी व शुद्धतेसाठी आश्रमात रोज सेवा करीत. त्यामुळे त्यांना पावित्र्य व शुद्धता प्राप्त होई. हा प्रसंग पुंडलिकाने अनुभवला. नद्यांनी देवीरूपात त्यास उपदेश केला. त्याला ज्ञान प्राप्त झाले.त्याने माता-पित्याची अखंड सेवेची दीक्षा घेतली.तो पुन्हा पंढरीस आला. भक्तिभावाने माता-पित्याची सेवा करू लागला.
पुंडलिकाची मातृ-पितृ भक्ती व सेवाव्रत पाहून भगवंत संतुष्ट झाले. ते पुंडलिकाचे भेटीसाठी लोहदंड तीर्थाजवळ आले. पुंडलिक माता-पित्याच्या सेवेत मग्न होते. भगवंताने त्यास दर्शन दिले, वर दिला. पुंडलिकाने त्याचे माता-पित्याची सेवा पूर्ण होईपर्यंत देवाला विटेवर उभे राहून प्रतिक्षा करण्याची विनंती केली. भगवंतानी त्याची प्रार्थना मान्य केली. पुंडलिकांनी देवाला उभा राहण्यासाठी वीट फेकली, ती वीट म्हणजे वृत्रासुराच्या शापाने दग्ध झालेला इंद्रच होय. भीमातीर म्हणजे दुसरी द्वारका, भगवान श्रीकृष्ण विठ्ठल रूपात कटीवर हात ठेवून भक्तासाठी युगे अठ्ठावीस अजूनही उभा आहे. संत शिरोमणी नामदेवराय आरतीत म्हणतात
|| पुंडलिकाभेटी परब्रह्म आले गा |

6/26/2012

नामस्मरणाचे फायदे

नामस्मरणाचे फायदे -

एखाद्या देवतेचे नाव किंवा मंत्र पुन:पुन्हा म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय !

शिवाचा नामजप -

‘ॐ नम: शिवाय ।’ हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नमः’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपणे म्हणावा. या वेळी आपण शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

श्रीरामाचा नामजप -

‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप करतांना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा ‘जय राम’ व त्यानंतरचा ‘जय जय’ मधील दुसरा ‘जय’ हे शब्द म्हणतांना त्यांवर जोर न देता ते हळुवारपणे उच्चारावेत व त्या वेळी ‘श्रीरामा, मी तुला पूर्णत: शरण आलो आहे’, असा भाव ठेवावा.

मारुतीचा नामजप -

' हं हनुमते रुद्रात्मकाय हुं फट ' हा नामजप हनुमंता साठी करावा. लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुति. देवतेप्रति सात्त्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो, तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो.

गणपतीचा नामजप -

‘ॐ गं गणपतये नम: ।’ (श्री गणेशाय नम:) हा नामजप करतांना नामजपात तारक भाव येण्यासाठी ‘नम:’ या शब्दावर जोर न देता तो हळुवारपण म्हणावा. या वेळी आपण श्रीगणेशाला साष्टग नमस्कार करत आहोत, असा भाव ठेवावा.

दत्ताचा नामजप -

‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपातील ‘गुरुदेव’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि ‘गुरुदेव’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून ‘दत्त’ हा शब्द म्हणावा.

श्रीकृष्णाचा नामजप -

‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपातील ‘नमो’ हा शब्द म्हणतांना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा. ‘भगवते’ या शब्दानंतर थोडा वेळ थांबून त्यानंतर ‘वासुदेवाय’ हा शब्द म्हणावा.

नामस्मरणाचे फायदे -

१) एकाग्रता वाढते

२) चित्तशुद्ध होते

३) वाचासिद्धी प्राप्त होते

४) दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही.

५) मन कायम आनंदी राहते.

६) सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांच्छित इच्छा पूर्ण होतात.