3/16/2020

post

Eckhart Tolle 

“The beginning of freedom is the realization that you are not “the thinker.” The moment you start watching the thinker, a higher level of consciousness becomes activated. You then begin to realize that there is a vast realm of intelligence beyond thought, that thought is only a tiny aspect of that intelligence. 

You also realize that all the things that truly matter – beauty, love, creativity, joy, inner peace – arise from beyond the mind. You begin to awaken.”

भक्तिरंग २

🙏🏻🌹🙏🏻स्वामी माझी माऊली 🙏🏻🌹🙏🏻

    🌹🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🌹

      🌺फलदायी बिरुदावल्या🌺

!! दिव्यज्ञानदाता - ॐ श्री स्वामी समर्थाय नमः !!

       विश्लेषण व अर्थबोध

क्र २३३) दिव्यज्ञान म्हणजे खूप आगळे वेगळे गूढ रम्य असते असे समजण्याचे काहीच कारण नाही यासाठी खूप उच्च पदवीचीही गरज नसते व्यावहारिक शहाणपण सर्वांप्रती दया क्षमा शांती आणि करूणा माणुसकीचा गहिवर मनाची संवेदनशीलता दुसऱ्याचे सुख दुःख जाणण्याची क्षमता याला दिव्यज्ञान म्हणता येईल यासाठी सदगुरूकृपा म्हणजे श्री स्वामी समर्थांची महत्त्वाची असते अध्यात्मिक दृष्ट्या गुरूकृपा म्हणजे काय यासाठी उपासक (साधक) कसा असावा याबाबत मार्गदर्शन करताना श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतात, "अवगुणांचा करूनि त्याग ! जेणे धरिला संतसंग !!१!! तयासी बोलिजे मग ! साधक ऐसा !!२!! (दा.५.९.२) देहबुद्धी विवेके वारी ! आत्मबुद्धी सदृढ धरी !! श्रवण मनन केलेचि करी ! या नाव साधक !!" दिव्यज्ञान प्राप्तीसाठी साधकात याबाबी आवश्यक आहेत आयुष्यात सुख समाधान शांतीसाठी दिव्यज्ञान प्राप्तीची तहान भूक लागावयास हवी की तहान भूक दिव्यज्ञानदाता श्री भागवू शकतात पुस्तकी ग्रंथीय शालेय कॉलेजमधील व अन्य शैक्षणिक संस्थामधून घेतलेले विविध प्रकारचे ज्ञान त्यांच्या ज्ञानदाता या बिरुदावलीत पूर्णतः अपेक्षित नाही केवळ अनुभवी ज्ञान ही यात गृहित नाही सर्व मानव जातीबद्दल दया क्षमा शांती आणि करूणेचे ज्ञान यातील सदसदविवेक सर्वाप्रती सहानूभूती आणि संवेदना याबाबत जे ज्ञान ते खरे ज्ञान त्याला दिव्यज्ञान म्हणता येईल श्री गुरूचरित्राच्या १६ व्या अध्यायात "संतुष्ट करिता गुरूसी ! काय न साधे तयाशी ! वेदशास्त्र ज्ञानराशी ! लाभे क्षण न लागता !!१३७!!" असे हे ज्ञान सदगुरू श्री स्वामी समर्थ कृपेतून प्राप्त होऊ शकते त्यासाठी त्यांची नित्य नियमाने डोळस सदसदविवेक बुद्धी जागृत ठेवून उपासना करावयास हवी त्यामुळे उपासकामधील अनिष्ट विचार विकाराची अंधारी रात्र संपून ज्ञानाची पहाट होते कारण ज्ञानदाता याबाबत श्री संत ज्ञानेश्वर माऊली अगदी सहज लिहून जातात. "गुरू तेथ ज्ञान ! ज्ञानी आत्मदर्शन ! दर्शनी समाधान ! आथी जैसे !!१८.१६३७!!" या बिरुदावलीची पार्श्वभूमी व भूमिका समजावून घेण्यासाठी श्री संत समर्थ रामदास स्वामी व श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही वचनांचा मुद्दाम उल्लेख केला दिव्यज्ञान म्हणजे काय यासाठी ज्ञान ज्ञानाच्या कक्षा माहितीवरून घ्यावयास हव्यात हा इथला प्रथम अर्थबोध आहे. (क्रमशः)

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे
अशक्यही शक्य करतील स्वामी
हम गया नहीं जिंदा है

लेखक 🌹प्रा डॉ यशवंतराव पाटील सर🌹नाशिक
मो.९८९०६१५६४९

हा ग्रंथ स्वानंद क्रियेशन येथे उपलब्ध आहे

पत्ता :- अर्थव अर्पामेंट ३९७ शनिवार पेठ पुणे पिन को.४११०३०
मो.नं.९८२३०१४८६२ / ९७६६५४१०९९

Hard copy Available online at :- www. bookganga.com & www.egranthalaya.com

email :- sales@egranthalaya.com

🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹🙏🏻🌹
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

भक्तिरंग १

🌹🌹१६ मार्च -🌹🌹

🌻🌺 प्रपंचातील आसक्‍ति कमी कशी होईल ? 🌺🌻

आज आमची स्थिती कशी झाली आहे पाहा; प्रपंच आम्हाला सुटत नाही; भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे; या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे. 

खरोखर, प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे. प्रेम ही वस्तू अशी आहे, की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल. एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत, त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही. 

आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे; आणि ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही. प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यतः नाहीशी झाली पाहिजे. शास्त्रातसुद्धा हेच सांगितले आहे. शास्त्र हे अनुभवाचे बनले आहे. आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहात नाही. 

प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही. आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही. ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे. 

प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे? एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो. त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही. त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे. 

हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी, शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत, आणि त्यासाठी आपले आचारविचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे. आपण आपल्या संस्कारांप्रमाणे वागलो तर निवृत्तिमध्येच जाऊ; कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्तिपरच आहे यात संशय नाही. आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करू या, म्हणजे नफातोटा त्याचाच होईल.

प्रपंचात सदाचाराने वागावे. सदाचार हा मूळ पाया आहे. नीतिधर्माचे आचरण असावे. नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत. 
विचाराने अत्यंत पवित्र असावे. कोणाचा द्वेष, मत्सर करू नये, आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये. 
उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत. नेहमी सर्वांशी गोड बोलावे. ज्या जिभेने आपण भगवंताचे नाम घेतो, त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या. अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा.

७६. प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे. तसे करण्यात समाधान आहे.
🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏